शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसंग्राम चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग व बेरोजगार तरुण मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी शिवसंग्रामचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्या पक्षा अधिक कळवधी लोटला मात्र जिल्ह्यामध्ये आणखीनही दमदार पाऊस झाला नाही उशिराने झालेल्या जेमतेम पावसामध्ये शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या केल्या मात्र कमी पावसा अभावी पिकांच्या वाढी खुंटल्या आणि पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत आता शेतकऱ्याच्या पदरात पीक पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने धरणे आंदोलनात करण्यात आली आहे
What's Your Reaction?