शिवशक्ती वाचनालयाकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

शिवशक्ती वाचनालयाकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

 परळी तालुक्यातील सेलू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांसह येथील शिवशक्ती सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

   या उपक्रमास शिवशक्ती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल प्रकाश शिंदे,पद्माकर शिंदे,अशोक शिंदे, लक्ष्मण शिंदे,लखन शिंदे,नवनाथ गर्जे,रावसाहेब शिंदे, गुलाब शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गायकवाड सर,चारमार सर यांचे सह उपसरपंच उमा शिंदे पोलीस पाटील बंडू जाधवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow