दमयंतीबाई धोंडे यांच्याकडून डोअर टू प्रचार

आष्टी प्रतिनिधी: विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सौ. दमयंतीताई धोंडे यांच्या कडा,धानोरा, साबलखेड येथील रॅलीस महिलांचा प्रचंड प्रतिसाद डोअर टू डोअर प्रचार जसजसे निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र आष्टी मतदारसंघात पहावयास मिळत आहे. शिक्षण महर्षी तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे हे अगोदरच प्रचारात उतरले आहेत . अपक्ष उमेदवार मा. आ. भीमराव धोंडे यांच्या सौभाग्यवती दमयंतीताई धोंडे व सुनबाई अक्षदा धोंडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी कडा, धानोरा, साबलखेड येथे डोअर टू डोअर जाऊन प्रचार करीत शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आश्वासन मतदारांना देत धोंडे साहेबांना मतदान करण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ठीकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदरील निवडणूक आता जनतेनेच हातात घेतल्यामुळे भीमराव धोंडे हे शिट्टी या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मतदारातुन बोलले जात आहे.धानोरा येथील रॅलीमध्ये सुरेखा शेळके, सविता धोंडे, कमा पठाण, जया गायकवाड, शबाना सय्यद, रेखा शेळके, अंजना गिरी, शबाना शेख, रत्नमाला तरटे, कविता गाडे, रुकसाना शेख, ठकुबाई गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला व कार्यकर्त्यांनी यावेळी सहभाग घेतला होता.
What's Your Reaction?






