भटक्या विमुक्त जमाती जिल्हाध्यक्षपदी डॉ रमेश कैवाडे

बीड प्रतिनिधी:- भटक्या विमुक्त जमाती संघटना, महाराष्ट्र या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी, डॉ. रमेश रामकृष्ण कैवाडे यांची निवड करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देऊन, अध्यक्ष उपराकर लक्ष्मण माने यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र राज्यामध्ये, अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक स्वरूपाची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते डॉ रमेश रामकृष्ण कैवाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, त्यांची बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना अध्यक्ष माने यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. सदर नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, आपली बीड जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. यामध्ये संघटनेची ध्येय, धोरण व फुले शाहू, आंबेडकरांचे पुरोगामी विचार बीड जिल्हयातील सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवाल, सर्वाना बरोबर घेऊन, विश्वासात घेवून आपण आपल्या संघटनेची जबाबदारी पार पाडाल असा विश्वास व्यक्त करत भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सदर निवडीने जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?






