शाश्वत विकासामुळे गाव स्वालंबी होतील डॉ. संजय तांदळे

पाटोदा (प्रतिनिधी)-शाश्वत विकासामुळेच गाव होतील स्वावलंबी असे प्रतिपादन डॉ.संजय तांदळे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन 2023- 24 अंतर्गत शाश्वत ध्येयाचे स्थानिकीकरण सुधारित नियोजन संदर्भात जिल्हा परिषद अंतर्गत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोबर 2023 रोजी दुसर्या दिवशीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षणार्थीशी संवाद साधताना व्यक्त केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, नवीन वर्षासाठी आपण नवनवीन संकल्प करतो हे संकल्प आपल्याला विकासाकडे नेतात. अशाच प्रकारे शाश्वत विकासाचा संकल्प सध्या जिल्ह्यात सुरू आहे, यासाठी 17 ध्येय व 9 संकल्पावर काम सुरू आहे. गावां गावासाठी शाश्वत विकासाचे ध्येय साध्य केले तर भविष्यातील मानव जातीचा सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम होऊन गावचा सर्वांगीण विकास होणार आहे असे मत प्रवीण प्रशिक्षक डॉ संजय तांदळे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन 2023- 24 अंतर्गत शाश्वत ध्येयाचे स्थानिकीकरण सुधारित नियोजन संदर्भात जिल्हा परिषद अंतर्गत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोबर 2023 रोजी दुसर्या दिवशीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षणार्थीशी संवाद साधताना व्यक्त केले.
पी .आर.टी.सी.खामगावचे प्रशिक्षण समन्वयक संजय समदूर, प्रवीण प्रशिक्षक डॉ. लक्ष्मण पवळ, यशवंत धायगुडे, अंमळनेरचे सज्जाचे आदर्श तलाठी जी .टी.वारुंगुळे, विस्तार अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी बापूराव श्रीमंत राख आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत ंतर्गत सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका,बचत गट ,मुख्याध्यापक , जल सुरक्षक, संगणक परिचालक, आशा वर्कर आदि कर्मचार्यांचा सहभाग होता.
What's Your Reaction?






