गणेशोत्सव काळात 02 गावठी कट्ट्यासह 04 जिवंत काडतुस घेऊन फिरणारा जेरबंद
बीड प्रतिनिधी:- शहरात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेशोत्सवामध्ये कडक बंदोबस्त पोलिसांकडून असतानाही एका फरार आरोपीकडे 02 गावठी कट्ट्यासह, 04 जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.
आरोपी सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान रा.माळीवेस बीड हा गुन्हा रजिस्टर नंबर 427/ 2023 नुसार 3,25 आर्म ऍक्टनुसार बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झालेला होता. पोलीस त्याच्या मागावरच होते .बीड शहरात आल्याची माहिती गुप्त माहिती बातमीदार मार्फत मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, तीन गावठी पिस्टन विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याची झाडाझडती घेतली असता दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साबळे, पोलीस उपनिरीक्षक खटावकर, मनोज वाघ ,प्रसाद कदम, विकास वाघमारे, गायकवाड, आंधळे, बागलाने, घायतडक आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?