ईपीएस 95 पेन्शनर मेळावा उत्साहात संपन्न
शहादा प्रतिनिधी :प्रभूदत्त नगर , उंटावद होळ ता.शहादा जिल्हा नंदुरबार येथील जि.प. प्रा.शाळेला आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पंचवीस वर्ष पुर्ण झाले. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत जेष्ठ नागरीकांचे स्नेहमिलन सुद्धा आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी "विद्यार्थी घडवला तरच संस्कृती वाचणार असल्याचे " जगन्नाथ चौधरी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले .
२५ वर्षांपुर्वी उदयाला आलेले प्रभूदत्त नगरातील प्रारंभीचे रहीवासी आदरणीय श्री. (रामभाई ) रामजी विठ्ठल पाटील उभद कर स्थानिक प्रभुनगर उंटावद होळ आणि त्यांचे सहयोगी ग्रामस्थ मंडळी यांनी लावलेले हे शैक्षणिक रोपटे आज मोठ्या वृक्षात रूपांतरीत होत आहे. या संगोपनात ज्या दानशूर व्यक्तींचे वेळोवेळी जे योगदान झालेले आहे त्यांचं ऋणनिर्देशन सुद्धा महत्वाचे ठरते. यास्तव या प्रसंगी आयोजकांनी अशा या थोर विभूतींचा सत्कार घडवून आणला त्यात प्रामुख्याने उबद (ता.निझर ,जि.तापी , गुजराथ) येथील मुळ रहीवासी आदरणीय श्री. जगदीशभाई पाहुबा बागुल अध्यक्ष मित्तल ग्रुप आफ्रिका अँड ए एस ब्रदर्स कंपनी जिल्हा तापी यांचा सुद्धा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ चौधरी यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आणि लोकवर्गणीतून शाळेला या कार्यक्रमात गॅस सिलेंडर रामभाई हस्ते शाळेला भेट देण्यात आली
विद्यार्थीनींच्या करकमलाद्वारे दिप प्रज्वलन , माता सरस्वतीचे पूजन आणि स्वागत स्तवन हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. या प्रसंगी प्रमुख पाहूणे जेष्ठ समाज भूषण वृक्षसोयरा आदरणीय काकाश्री हैदर अली नूराणी , जेष्ठ समाज सेवक जलसंवर्धन प्रेमी आदरणीय आप्पासाहेब श्री. डी. एच. पाटील , कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुरबारचे श्री. जगन्नाथ भाऊ चौधरी , श्री. शिवदास गोविंद पाटील ,साने गुरूजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. माणकभाई चौधरी , उपाध्यक्ष मा. पवार दादा,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ममता पाटील , केंद्र प्रमुख अल्का जयस्वाल , केंद्र मुख्याध्यापक सामोळे सर,कार्यक्रमासाठी नंदुरबार येथून खास उपस्थित झालेले ईपीएस 95 योजना सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनाचे मा. श्री. सुधाकर धामणे , मा. श्री. सुभाष रघुवंशी , मा.श्री. रोहीदास सौपुरे ,मा.श्री.काशिनाथभाई चौधरी , गावाचे सरपंच श्री.राहूल ठाकरे , ग्रामसेवक श्री.महेश चौधरी, ग्रामस्थ बंधूभगिनी , जेष्ठबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.छाया चुनीलाल न्हासदे व श्रीमती योगिता नरेंद्र भामरे आणि त्यांचे सहयोगी शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाचे खुपच सुंदर आयोजन करून रौप्य महोत्सवी वर्षाला जी सफलतेची मानवंदना केली ती खरोखरच प्रशंसनीय ठरली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा. डी.जी.पाटील सर यांनी केले तर प्रास्ताविक भाषण श्री रामजी भाई यांनी शाळेचे व विद्यार्थी यांच्या विकासासाठी विस्तृत माहिती दिली आभार प्रदर्शन केंद्र मुख्याध्यापक मा. श्री. रामोळे सर यांनी केले. सर्वांचा सहकार असला म्हणजे अल्पावधीत सुद्धा शाळेचा पर्यायाने गावाचा विकास कसा घडून येतो याचं हे उत्तम दर्शन म्हणजे शाळेच्या या रौप्य महोत्सवी वर्षाचे आयोजनात दिसून आले. राष्ट्रीय गीत झाले. कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला.
What's Your Reaction?