ईपीएस समन्वय समितीचे वेतन वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीड प्रतिनिधि: कर्मचारी ईपीएस 1995 राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश प्रकाश यडें ,सचिव प्रकाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करत शासन दरबारी ईपीएस पेन्शन वाढी बाबत प्रयत्न करत आहेत. देशभरात 72 लाख ईपीएस पेन्शन धारक असून एक दोन हजार रुपये प्रति महा तुटपुंजा पेन्शनमध्ये आपले हालाकीचे जीवन जगत आहेत. दहा वर्षांमध्ये एक रुपयाची देखील पेन्शन वाढ झालेली नाही. संसद भवन मध्ये अनेक खासदारानी पेन्शन वाढीसाठी आवाज उठविला असताना देखील पंतप्रधान(pm) याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोषायारी कमिटीच्या अहवालानुसार पेन्शनधारकांना वाढत्या महागाईच्या निर्देशांकानुसार पेन्शन 9000 व अधिक महागाई भत्ता देण्यात यावा अशी मागणी निवृत्त कर्मचारी ईपीएस 95 विभागीय समितीच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे विभागीय संघटक तथा बीड जिल्हा अध्यक्ष डॉ संजय तांदळे, कोषाध्यक्ष सुदाम कोळेकर, दीनानाथ शेवलीकर, भाऊसाहेब फुंदे आदीनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पेन्शन नाही तर मतदान नाही देशभर अभियान राबवत 29 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर महामोर्चा काढण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
What's Your Reaction?