राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी खुर्शीद आलम यांची निवड
बीड(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन आणखी मजबूत करण्याच्या दृष्ट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी माजी सभापती खुर्शीद आलम यांची नियुक्ती केली आहे बीड येथील राष्ट्रवादी भवन मध्ये झालेल्या बैठकीत नगरपालिकेचे माजी सभापती हर्षद आलम यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, ज्येष्ठ नेत्या सुशीला ताई मोराळे यांच्या हस्ते खुर्शीद आलम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्यासह उपस्थित अनेक मान्यवरांनी खुर्शीद आलम यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान खुर्शीद आलम यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि मेहनती इमानदार चेहरा असलेल्या व्यक्तीवर शहराध्यक्ष पदांची जबाबदारी सोपवून आमदार संदीप भैया आणि संघटन बांधणीची संधी दिली आहे सामाजिक कार्यात खुर्शीद आलम नेहमी पुढेच असतात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर सतत आवाज उठविणे रस्त्यावर उतरणे आदी माध्यमातून पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून त्यांच्या कर्तुत्वाला चार चांद लावत काम करायची मोठी संधी दिली आहे, यावेळी मा. सभापती खुर्शीद आलम यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात भलीच मोठी गर्दी झाली होती,
What's Your Reaction?