जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करा !सुरेश पाटील
बीड/प्रतिनिधि
जिल्हयातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्या, संबंधीत गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कोणी देत असेल तर त्यांच्यावरही सह आरोपी करून गुन्हे दाखल करा अशी विनंती शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा जेष्ठ समाजसेवक सुरेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) जिल्हा पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना केली.
शासनाने जिल्हा पोलीस दलातर्फे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एल.सी.बी.) ही यंत्रणा उभारली आसून जिल्हा पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांना बोलताना सांगितले की, पोलीस अधिक्षक नंदकिशोर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे पोलीस दलाचे मूलभूत अंग आहे. जिल्ह्यात कोठेही अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे आम्हाला सर्वाधिकार असतात. त्यामुळे या शाखेसाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची धडपड असते. ही शाखा कोणतीही कारवाई मोठ्या जोमाने करते, या विभागातील सर्व कर्मचारी एखादा गुन्हा उघडकीस अनायचे ठरवले तर त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तपास लावतात. या यंत्रणेत पोलीस दलातील अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असल्याने. मटका, जुगार, तसेच जिल्हयातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यांचा उपयोग होतो. ‘एलसीबी’ पोलिसांसमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे, त्यांनाच ‘एलसीबी’ या विभागात जागा असते, अशीही माहिती सुरेश पाटील यांना साबळे साहेबांनी दिली.
What's Your Reaction?