नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ
चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीला पळवून नेले. संतापजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.

सख्या चुलत भावाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याची संतापजनक घटना युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. याआधी या चुलत भावावर आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्याने अल्पवयीन असलेल्या बहिणीला चक्क पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील एका गावाततील अवघे साडे सतरा वय असलेली दहावीत शिकणारी मुलगी ही आपल्या मामाकडे अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव आणि केज पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मामाच्या गावी आपल्या आजोळी आली होती. काही दिवस या ठिकाणी ती राहिली मात्र ३१ मे रोजी ही मुलगी घरात कुठेही आढळून आली नाही.
यामुळे मुलीच्या मामाने तिच्या आई-वडिलांना या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठे आढळून आली नाही. यानंतर आई-वडिलांच्या फिर्यादीवरून त्यांच्याच पुतण्याने तिला कोणत्यातरी कारणाचे आमिष दाखवत पळवून नेल्याची तक्रार पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पुतण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?






