पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना वय आणि वेळ वाढवून द्या! नितीन सोनवणे

बीड प्रतिनिधी- लॉकडाऊन मध्ये कसल्याही प्रकारची शासनाची भरती न निघाल्यामुळे मुलांचे दोन वर्षे वाया गेले आहेत तरी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी व पंधरा दिवस अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवून उद्या अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे.
2020 ते 2021 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कसल्याही प्रकारची शासकीय नोकर भरती करण्यात आली नव्हती प्रलंबित असतानाही परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या तरी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास व ग्रह विभागास विनंती करत आहोत की सार्वत्रिक साथ रोगामुळे एक जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवागांचे उमेदवार निवडीद्वारे मुक्त पदांसाठी सन 2020 व 2021 या कालावधीमध्ये वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात या वयाच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळेची उपयोजना म्हणून पात्र असतील असा जीआर शासनाने काढला होता त्याच संदर्भात या सर्व बाबींचा विचार करून दोन वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी व 31 मार्च ही तारीख अर्ज भरण्याची शेवटची आहे ऑनलाइन साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिले आहेत, म्हणून पंधरा दिवसांचा वेळ अर्ज भरण्यासाठी वाढवून देण्यात यावा नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष, आकाश देवकते, ज्ञानेश्वर शिंदे ऑल इंडिया पॅंथर सेनेनी मागणी केली आहे.
What's Your Reaction?






