शेतकऱ्यांनो पहा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून धडकलेला असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापलेला दिसत आहे. मान्सूच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झालेले दिसत आहे. त्यामुळे पुढील चार दिवसा मध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये व्यापण्याची शक्यता वर्तवन्यात आलेली आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
नाशिक, रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरामध्ये पावसाची शक्यता वर्तवन्यात आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमधून मान्सून समोर जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. यावेळी ढगाळ वातावरण तयार झालेले असेल. तर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तळकोकणासह इतर अनेक भागात आज पावसाने हजेरी लावलेली दिसत आहे.
राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मंगळवारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्या मधील काही भाग आणि विदर्भाला वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.आज नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोल, गोंदिया, भंडारा या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
15 जून रोजी राज्यातील -चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडन्याची शक्यता वर्तवन्यात आलेली आहे. त्याशिवाय हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस उर्वरित राज्यात पडण्याची शक्यता वर्तवन्यात आलेली आहे. व तसेच राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहिल असे सांगण्यात आलेलं आहे.
What's Your Reaction?






