शेतकऱ्यांनो ई केवायसी करून घ्या सरपंच सिरसाट

तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी ई - के वायसी करावी - सरपंच महेश सिरसाट यांचे आवाहन
तालुक्यातील शेतकरी बांधवानी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी आधारकार्ड बॅक खात्याशी संलग्न करण्याचे आवाहन सरपंच महेश सिरसाट यांनी केले आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. या सोबतच राज्य सरकार कडून ६ हजार रुपयांचा लाभ देण्यात आहे. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले असून या दोन्ही बाबी लाभार्थ्यांनी परिपूर्ण केल्याशिवाय त्यानां पुढील हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षातून तीन वेळा या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षातून सहा हजार रुपये देण्यात येतात. राज्य सरकारनेही केंद्र सरकारच्या धर्तीवर सहा हजार देण्याची घोषणा केली आहे. आगामी 14 व्या हप्त्यापासुन राज्य सरकार कडून हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर आधार हे बँक खात्याला संलग्न करून घ्यावे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. बँक खाते 48 तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सुलभ आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी, असे आवाहन तेलघणा गावचे सरपंच महेश सिरसाट यांनी केले आहे.
What's Your Reaction?






