गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

परळी प्रतिनिधी:- वैजवाडी येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
परळीपासून जवळच असलेल्या वैजवाडी येथील शेतकरी बालाजी ढाकणे व ४५ यांना दोन एकर जमीन असून त्यांनी शेतीवर कर्ज घेतलेले आहे. सध्या पाऊस नसल्याने सोयाबीन पोक बळत असल्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते. यातच बुधवार दि.३०. ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो. ह. तोटेवाड, पो. ह. चरत, चालक गिते यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी ढाकणे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, १ मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






