बस आणि दुचाकीचा भीषण अपघात एक ठार

बस आणि दुचाकीचा भीषण अपघात एक ठार
बस आणि दुचाकीचा झालेला अपघात

धारूर प्रतिनिधी:-  बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची, दुर्दैवी घटना धारूरमध्ये घडली आहे. यावेळी घटनास्थळी धारूर पोलीस दाखल झाले होते. सदर घटना आज रविवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे.

धारूर शहरालगत धारूर केज महामार्गावर, बस क्रमांक एम एच 14 बीटी 25 34 या क्रमांकाची बस ,ही कळम माजलगाव बस होती. व दुचाकी क्रमांक एम एच 44 जे 92 07 यांच्यामध्ये जोराची धडक झाल्याने, भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. चंद्रभान भगवान मैद राहणार मैईंदवाडी तालुका धारूर असे त्या मयताचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमली होती. यावेळी तात्काळ पोलिसांना याची माहिती मिळताच, घटनास्थळी धारूर पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow