धारूरच्या घाटात भीषण अपघात

धारूरच्या घाटात भीषण अपघात

धारूरच्या घाटात आज पुन्हा सकाळच्या दरम्यान भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

धारूरच्या घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून आज रविवार दिनांक 23 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान धारूरच्या घाटात वळणावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच 23 जे 93 10 ही समोर जात असताना तिला एका वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. सदर दुचाकी पुढे जात असलेल्या क्रुझर गाडी क्रमांक एम एच 13 14 17 गाडीला जाऊन पाठीमागून धडकली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीरित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow