ॲपे रिक्षा आणि कंटेनरचा भीषण अपघात आईसह दोन मुलांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी: _थेटेगाव धारुर वरून बीड कडे येत असताना व कंटेनर बीड वरून परळी कडे जाताना बकरवाडी फाटा घाटसावळी जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात रिक्षात असणाऱ्या आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर स्वरूपात जखमी असून एका खाजगी हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजीम शेख राहणार इस्लामपुरा राजू चौक आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटेगाव तालुका धारूर येथे आपल्या सासरवाडीला गेले होते परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनर आपला ताबा सोडला यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली यामध्ये 1) नसरीन अजीम शेख वय 35, 2)नोमान अजीम शेख वय 13, 3) अदनान अजीम शेख वय 12, या अपघातामध्ये जागीच ठार झाल्याची धक्कदाय घटना घडली रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास करत आहे.
What's Your Reaction?






