ट्रक दुचाकीचा भीषण अपघात ;एक ठार

आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज शनिवारी घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ट्रक क्रमांक एम एच 16 सीडी 24 66 हा आष्टी मधून जामखेड मार्गाने सिमेंट घेऊन जात होता, सदरील ट्रक चालक हा भरधाव वेगात ट्रक चालवत असल्याने डॉ.आंबेडकर चौकामध्ये आला असता समोरच्या दुचाकी क्रमांक एम एच 23 एम 97 19 या दुचाकीस्वराला चिरडले. यामध्ये दुचाकी स्वार रामकिसन काकडे वय 66 रा. रशीदेवाडी यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी तात्काळ नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले.सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
What's Your Reaction?






