उदंड वडगाव फाट्यावर भीषण अपघात; दोन ठार

उदंड वडगाव फाट्यावर भीषण अपघात; दोन ठार

बीड तालुक्यातील उदंड वडगाव फाट्याजवळ एसटी आणि पिकपचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर 24 जन जखमी झाल्याची घटना घडली आहे.

परभणीहून बीडमार्गे देव दर्शनाला काही भक्त पिकअपद्वारे जात होते. यावेळी सदरील पिकअप हा बीड तालुक्यातील उदंड वडगाव फाट्याजवळ आला असता या पिकअपला एसटी बसने जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील रंगुबाई साहेबराव जाधव (रा. बागीरोड परभणी) व मथुराबाई पांडुरंग गवाले या दोन महिला ठार झाल्या आहे .यांच्यासह इतर 24 जण ही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील पिकअप मध्ये बसून भक्त काळुबाईच्या दर्शनासाठी बीड मार्गे जात होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow