बार्शी रोडच्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करा! दीपक चौगुले
बीड प्रतिनिधी : मानवता सिध्द होताना नियती त्याचा जिवंत दाखला माघत असते, असाच एक पेच पाचंग्रे कुटुंबा समोर उभा राहिला आहे, बार्शी नाका येथील सामान्य कुुंबातील हा मुलगा वडीलाचे छत्र डोक्यावर नसताना हाॅटेलमध्ये काम करून उपजीविका भागवत असे
महेश राजेंद्र पाचंग्रे यांचा गुरुवार दिनांक २८ /९ रोजी साई मंदिर येथे दर्शनासाठी जात असताना बार्शी रोडवरील स्वराज्य नगर पाशी तो धोकादायक खड्डा चुकवताना गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर ईजा होऊन मेंदुला मार लागला त्या अवस्थेत त्यांना लोटस हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातात झालेल्या रक्तस्त्रावाने मेंदूत गाठी झाल्या होत्या 29/9 रोजी सदर गाठीचे ऑपरेशन झाले होते मात्र ऑपरेशन झाल्यापासून महेश बेशुद्ध अवस्थेत होता तो मुत्यूशी झुंज देत होता पण आज काळाने त्याच्यावर घाव घातला व त्याला काळच्या पडद्या आड नेले त्याचा मृत्यू झाल.
आज तो खड्डा मुरूम टाकून बुजून घेतला आहे मात्र अस बीड मध्ये किती दिवस चालणार आहे जो परियंत एखाद्यचा जीव जात नाही तो परियंत येथील राजकारणी मंडळींना जाग येत नाही का. जो कोणी संबंधित गुत्तेदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी दीपक चौगुले यांनी बार्शी नाका येथून केलेली आहे.
What's Your Reaction?