अन्न गळ्यातून उतरत नाही, जाणून घ्या घसादुखीची कारणे
अनेकदा एखादा पदार्थ गिळायला अडचणी निर्माण होतात. अशाप्रकारचे लक्षण आढळले, तर ती घशाच्या विकाराची सुरुवात असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. काहीवेळा द्रव पदार्थ गिळताना ठसका लागतो तर काहीवेळा अन्न गळ्यातून उतरत नाही असे वाटते. अशी स्थिती कधी कधी निर्माण झाली, म्हणजे त्यात फारसे अनैसर्गिक काही नसते. पण, जीभ कोरडी पडू लागणे, अन्न गिळण्यास अडचण … The post अन्न गळ्यातून उतरत नाही, जाणून घ्या घसादुखीची कारणे appeared first on पुढारी.
अनेकदा एखादा पदार्थ गिळायला अडचणी निर्माण होतात. अशाप्रकारचे लक्षण आढळले, तर ती घशाच्या विकाराची सुरुवात असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नये.
काहीवेळा द्रव पदार्थ गिळताना ठसका लागतो तर काहीवेळा अन्न गळ्यातून उतरत नाही असे वाटते. अशी स्थिती कधी कधी निर्माण झाली, म्हणजे त्यात फारसे अनैसर्गिक काही नसते. पण, जीभ कोरडी पडू लागणे, अन्न गिळण्यास अडचण जाणवणे, या स्थितीत अन्न पुढे सरकले नाही तर ते तेथे अडकल्याची जाणीव संबंधित व्यक्तीला होऊ लागते. घशात एखादा गोळा असल्याचे भासते. पण, अन्न किंवा पाणी गिळण्यास अडचण जाणवत नाही. घास खाल्ल्यानंतर घसा आणि अन्ननलिकेच्या सुरुवातीचा स्नायू तो पुढे ढकलण्यास महत्त्वाचे काम करीत असतात. परंतु, काही कारणाने ते स्नायू कमकुवत झाले तर प्रवाही पदार्थ गिळताना त्रास जाणवू लागतो, असे पदार्थ गिळताना वारंवार ठसका लागतो. स्नायूचे आजार किंवा मेंदूच्या आजारांमध्ये असे लक्षण दिसते. द्रव पदार्थाच्या तुलनेत घट्ट अन्नपदार्थ गिळणे सोपे वाटते. हे लक्षण रेबीज आजारात प्रामुख्याने दिसत असले तरीही मायास्थेनिया ग्रॅव्हिस या स्नायूंच्या आजारातही बरेचदा गिळण्यास अडचण होते. या आजाराचा शरीरातील प्रतिपिंडे निर्माण करणार्या संस्थेशी संबंध आहे. मात्र, अलीकडे यावर आता चांगले उपाय उपलब्ध आहेत. (Sore throat)
मानेच्या आजारात क्ष-किरणांनी अधिक काळ उपचार केल्यास लाळ तयार करणार्या ग्रंथींवर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. यामुळे किंवा ग्रंथीवरील शस्त्रक्रियेमुळे लाळ कमी प्रमाणात स्त्रवते. परिणामी गिळण्यात अडचण निर्माण होते. तसेच थायरॉईड ग्रंथीमध्ये गाठी निर्माण झाल्यास अन्न गिळणे अडचणीचे होऊ शकते. लोहाची कमतरता असल्यास घशातून अन्ननलिकेत जाण्याच्या मार्गात एक पडदा तयार होतो. त्यामुळेही गिळायला अडचण निर्माण होते. अन्ननलिकेचा कर्करोग हेदेखील अन्न गिळण्यास त्रास होण्याचे एक कारण असू शकते. अर्थात यास प्रत्यक्ष तपासणी आवश्यक असते. म्हणूनच असा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांकडून नेमके कारण समजून घ्यावे आणि त्यावर उपचार करावे. सुरुवातीच्या काळातच उपचार केल्यास आजार पूर्ण बरा होऊ शकतो. (Sore throat)
What's Your Reaction?