डिझेल चोरी करणारे परप्रांतीय पोलिसांनी केले गजाआड
बीड प्रतिनिधी:- डिझेल चोरी करणाऱ्या परप्रांतीयांच्या चकलांबा पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले, त्यांच्याकडून एक कोटी चार लाखाचा मुद्देमाल केला जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, पाथर्डी ते कोळगाव जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील हॉटेल रणवीर येथे दोन रिलायन्स कंपनीचे डिझेलचे भरलेले टँकर उभे आहेत व त्यामधून एक इसम डिझेल चे टँकर मधे पाईप टाकून डिझेल काढत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे प्रभारी नारायण एकशिंगे यांनी लागलीच टीम पाठवून दिनांक 05/08/2023 रोजी अंदाजे 17.45 वाजता बातमीचे ठिकाणी छापा मारला आसता सदर ठिकाणी एक इसम टँकर क्रमांक mh.46.bm.8494 वर एक हिरव्या रंगाचा पाईप टँकर वरील झाकण खोलून त्यात पाईप टाकून टँकर चे डिझेल टाकीत टाकीत सोडत असताना आम्हाला मिळून आला व डिझेल टाकी जवळ एक 20 लिटरचे डिझेल ने भरलेले कॅन्ड मिळून आला. तसेच सदर गाडीचे बाजूला एक टँकर क्रमांक mh.04.ku.2834 हा लोकांना डिझेल चोरी करताना दिसू नये अशा पद्धतीने उभा करून त्या टँकरवर एक इसम डिझेल चोरी करण्याच्या तयारीत बसलेला मिळून आला . मिळून आलेल्या दोन्ही इसमा चे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव चंद्रभान राधेश्याम सरोज वय 24 वर्षे राहणार सगरा सुंदरपूर तालुका जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश 2. मुबारक सलीम मुल्ला अली वय 40 वर्ष राहणार बंगरा तालुका नवगड जिल्हा सिद्धार्थ नगर राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगितले. मिळून आलेले इसमांना विचारपूस केली असता चंद्रभान राधेश्याम सरोज हा टँकर क्रमांक एम एच 46 बीएम 84 94 चा चालक असल्याचे सांगितले तसेच मुबारक सलीम मुल्ला अली हा टँकर क्रमांक एम एच 04. के यु 28 34 चा चालक असल्याचे सांगितले त्यांना टँकर मधून काढलेले डिझेल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले मिळून आलेले दोन्ही टँकर व इसम तसेच डिझेलचे भरलेले कॅन असे सर्व वस्तू पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी जप्ती पंचनामा करून पोलीस स्टेशन येथे घेऊन आले.
वरील इसमांच्या ताब्यात खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला
1. भारत बेंझ कंपनीचे टँकर एम एच 46 बी एम 84 94 यामध्ये अंदाजे 24 हजार 760 लिटर डिझेल असलेला किमती अंदाजे 54 लाख रुपये
2. टाटा कंपनीचा टँकर क्रमांक एम एच 04. के यु 28 34 ज्यामध्ये 25000 लिटर डिझेल असलेला किमती अंदाजे पन्नास लाख रुपये
3. एक वीस लिटर डिझेलचा भरलेला पांढरा रंगाचा कॅन किमती अंदाजे 1840 रुपयांचा
4. एक हिरव्या रंगाचा डिझेल काढण्यासाठी वापरलेला प्लास्टिकचा वीस फूट लांबीचा पाईप किमती अंदाजे झिरो झिरो
असा एकूण एक कोटी चार लाख १८४० रुपयाचा मुद्देमाल तपासणी जप्त करण्यात आला असुन वरील आरोपींतांच्या विरुध्द *पो.स्टे. चकलांबा येथे गुरनं 249/2023 कलम 379,511,34 भादवि* प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार बारगजे हे करीत असुन आरोपी त्यांना अटक करून तपास सुरू आहे. सदर प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री.नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, मा.उपविभागीय अधीकारी श्री.नीरज राजपुरु साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि नारायण एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे, पोउपनी परमेश्वर इंगळे पोह/राम बारगजे , पोअं/89 किरण मिसाळ पोअं/231 घोंगडे पो.अ/1559 गायकवाड यांनी केली आहे
What's Your Reaction?