सिरसाळा येथे दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात चौघे गंभीर जखमी

सिरसाळा येथे तेलगाव रोडवर दोन कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चौघेजण गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कार क्रमांक एपी 27 सीजी 1459 या कारने एक कुटुंब आंध्र प्रदेशातून सिरसाळा मार्गे शिर्डी कडे जात होते. मात्र सदर कार सिरसाळा येथे तेलगाव रोडवर वळणावर आली असता, समोरून येणारी कार क्रमांक एम एच 12 पी एन 76 75 ही कार पुणे इथून आली होती. मात्र वळणावर समोरासमोर या दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आंध्र प्रदेशातील चौघे गंभीरित्या जखमी झाले. आहेत यामध्ये एक महिला, दोन मुली, आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटना घडताच नागरिकांनी याची माहिती सिरसाळा पोलिसांना दिली. यावेळी तात्काळ घटनास्थळी सिरसाळा पोलीस कर्मचारी मुंडे, मेंडके, पोकळे, सय्यद, जेटेवाड दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
What's Your Reaction?






