आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात दोन ठार
बीड प्रतिनिधी: आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण ठार झाले असून, अन्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात आज सोमवारी सायंकाळी घडला आहे. सदर घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड शहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, छत्रपती संभाजी राजे चौका जवळ एक आयशर टेम्पो, हा मांजरसुंबा कडून येत होता, सदर आयशर टेम्पो भरधाव वेगात असल्याने, सदर चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटला. आणि तो बाजूने जात असलेला छोट्या हत्तीला जाऊन धडकला.नंतर गॅस एजन्सीच्या रिक्षाला धडकला. तेथे अन्य दुचाकीस्वार ही धडकले, सदर टेम्पो हा मालवाहू होता. या झालेल्या विचित्र अपघातात, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. सदर घटना आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे.हा अपघात एवढा विचित्र होता की, यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. व अन्य दहा जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
What's Your Reaction?