फरार आरोपी विक्रम शिंदे अटक

गेल्या काही महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मुस्क्या आवळून जेरबंद केले आहे. गेली अनेक महिन्यापासून पोलीस त्याच्या शोधात होते. तो रस्त्यावर जॅक टाकायचा आणि वाहनधारकांना अमिश दाखवून लुटायचा मात्र त्याला आता जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विक्रम आप्पा शिंदे रा.नांदूरघाट ता. केज हा महामार्गावर रस्त्यावर जॅक टाकायचा आणि वाहनधारकांना आमिष दाखवून त्यांना लुटायचा असाच प्रकार त्याने 23 मे 2022 रोजी मस्साजोग शिवारात त्याने महामार्गावर जॅक टाकला, त्याच्या अमिषाने खाली उतरलेल्या ट्रक चालकावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीने दरोडा टाकला मात्र त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने सदरची टोळी उघडकीस आणली होती. मात्र यातील निष्पन्न असलेला आरोपी विक्रम शिंदे हा तेव्हापासून फरार होता. आज नांदूर घाट येथून आरोपी विक्रम शिंदे याच्या मुस्क्या आवळण्यात बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?






