भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यासाठी गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंकुश गायकवाड मुंबई :- भटक्या विमुक्त बहुजन वंचित संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे दिनांक:- 19/10,/2023 रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.असून भटक्या विमुक्त बहुजन वंचित समाजातील विविध विषयावर लवकरच मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सदरच्या निवेदन सादर करण्यात आले त्या विविध मागण्या खालील प्रमाणे आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. कैकाडी समाजावर लाभलेल्या क्षेत्रीय बंधन त्वरित उठवण्यात यावे. राजपूत समाजाला भामटा राजपूत असा जातीचा दाखला मिळावा. कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे सरसकट दाखले मिळण्यात यावे. विमुक्त भटक्या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये आणि व्यवसायामध्ये सवलती मिळविण्यात यावे. अशा विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सादर करण्यात आले आहे.
याप्रसंगी भटक्या विमुक्त वंचित बहुजन समाजाचे जेष्ठ नेते रवींद्र गायकवाड, भटक्या विमुक्त बहुजन वंचित संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा पत्रकार अरुण भाऊ धनगर, भटक्या विमुक्त समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते अंकुश गायकवाड तथा पत्रकार ठाणे/मुंबई यांच्या सह भटके विमुक्त बहुजन वंचित संघटनेचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






