गेवराई पंचायत समितीत दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला

गेवराई पंचायत समितीत दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला

गेवराई प्रतिनिधी:- गेवराई पंचायत समिती अंतर्गत मंजूर झालेल्या गाय गोठा फाईल संदर्भात येथील एकास दोन हजाराची लाच स्विकारताना एसीबीने आज रंगेहात पकडले. या कारवाईमुळे लाचखोरांचे दाबे दणाणले आहेत. कोणी जर लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी बीड एसीबी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन येथील एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षापासून सर्वत्र भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून याचे प्रमाण जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतू येथील एसीबीचा पदभार पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांनी घेतल्या पासून लाचखोरांचे दाबे दणाणले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत अनेक कारवाया करत अनेकांना जेरबंद केलेले आहे. आज गेवराई येथील पंचायत समितीतील अमोल रामराव आतकरे, वय -38 नोकरी, शिक्षक (सध्या प्रतिनियुक्तीवर पंचायत समिती गेवराई येथे अभिलेख व्यवस्थापनासाठी संलग्न) यांनी संबंधित तक्रारदाराकडून गाय गोठ्यातील फाईल चे वर्क कोड करुण , सिक्युर कोड काढून ,अर्ज ऑनलाइन फिडींग चे काम करवून देण्यासाठी दोन हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, भरत गारदे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow