भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या! राजहंस
Latest Beed News in Marathi: ilovebeed.com covers all the latest Beed news in Marathi. Get daily Trending Beed News in Marathi language. बीड : ताज्या मराठी बातम्या at Ilovebeed.com
घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय भालेराव या दलित तरुणाची निर्घृण हत्या करणात आली. या घटनेतील काही आरोपींना अटक केली असली तरी जातीवादी मानसिकतेच्या या निर्दयी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका मागासवर्गिय तरुणाची निर्घृण हत्या करणे महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. अक्षय भालेरावची हत्या आणि बोंडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. राज्यात व देशात जातीवादी व धर्मांध शक्तींची सत्ता आल्यापासून दलित, अल्पसंख्याक समाजावरील हल्ले व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कायद्याचा वचक राहिला नसल्याने अशा घटना घडत आहेत. भाजपाच्या राज्यात बुलडोझर न्यायाची कुप्रथा सुरु केली आहे. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला जातो मग अक्षय भालेरावच्या मारकऱ्यांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? का फक्त वंचित, दलित, मागास, अल्पसंख्याक समाजाच्या घरांवरच बुलडोझर चालवण्याची मर्दुमकी दाखवणार? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय भालेराव हत्येप्रकरणी जातीने लक्ष घालावे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन समाजात पुन्हा असे कृत करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे राजहंस म्हणाले. राजहंस
What's Your Reaction?