जरांगे सारख्या वाघाच्या हातात सत्ता द्या! सुरेश पाटोळे

बीड (प्रतिनिधी) गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध आंदोलने झाली आहेत. काही गरीब मराठा समाजातील तरूणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. काही जणांवर आणखी केसेस आहेत या राज्यात आठ्ठावन मुक मोर्चे शांततेत झाले आहेत हे अख्या देशाने पाहिलेले आहेत. काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असतांना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गालगोठ लावले गेले. पोलीसांनी आंदोलनकर्ते यांच्यावर बेछूट लाठीचार्ज व गोळ्या झाडल्या आहेत त्यांचा शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य तीव्र शब्दात निषेध करतो. असे सुरेश पाटोळे पाटील यांनी बोलतांना सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला संबोधित करताना सुरेश पाटोळे बोलत होते यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आंदोलनकर्ते आतंकवादी असल्या सारखे त्यांच्यावर छरे व अश्रू धुराच्या नळकांड्याचा मारा केला आहे यात बरेच आंदोलनकर्ते जखमी झाले या लाठीचार्ज नंतर एकाही श्रीमंत मराठा समाजाचा आमदार खासदार मंत्र्यांनी सरकारच्या विरोधात ' ब्र ' शब्द काढला नाही किंवा साधा निषेध केला नाही. ज्या पद्धतीने या मराठा आमदार खासदार मंत्र्यांनी निषेध करायला पाहिजे होता त्या पद्धतीने केला नाही मराठा समाजाचा उद्रेक पाहून समाजा समोर दिखावा करण्यासाठी काहीजण सोबत असल्याचे नाटक करत होते. हे सर्व अख्या समाजाने पाहिलेले आहे, आजपर्यंत हेच आमदार खासदार मंत्री समाजाचा जीवावर मोठे झाले आहेत समाजाला गरज असताना हे आमदार खासदार कामी येत नसतील तर समाजाला अशा आमदार खासदार मंत्र्यांची गरज नाही आता मराठा समाजाने विचार करायला पाहिजे जे समाजाचा कामी येत नाहीत त्यांना आता आम्ही मतदान करणार नाही वेळ आली आहे ह्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची, असेही सुरेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
What's Your Reaction?






