अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत द्या!वाकसे
•बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यासह राज्यभरात २६ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन हे अतिशय कमी प्रमाणात पिकले व याचा परिणाम तूर.कापूस. इत्यादी पिकावर झाला पाऊस नसल्यामुळे शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या व कापसाचे पीक सुद्धा सुकले त्याचप्रमाणे तुरीला पाहिजे तसे फुले लागले नाहीत. खरिपाचा हंगाम गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणात केली होती आणि आपली शेती पूर्णपणे तयार करून हरभरा पिकाची पेरणी जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात झाली हरभरा गहू ज्वारी. पेरणीनंतर आठवड्याभरातच या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात हजेरी लावली आणि पावसाबरोबरच धुके सुद्धा मोठ्या प्रमाणात आल्याने काही हरभरे हे उगवल्यानंतर धुक्यामुळे जळून नष्ट झाले तर काही हरभरे अति पावसामुळे जमिनीतच कुजले आहे त्याचबरोबर ज्वारी गहू याचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचबरोबर शेतामध्ये असलेला कापूस कापसाच्या वाती झालेले आहेत तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहेत त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी केले आहे
तत्काळ सर्वे, तत्काळ मदत करा!
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या अतिवृष्टीच्या पावसाचा सरकारने सर्वे करून तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे दत्ता वाकसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
What's Your Reaction?