ज्ञानराधा मल्टीस्टेटने गोरगरिबांच्या ठेवी तात्काळ परत कराव्यात टायगर ग्रुपची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना तक्रार
बीड प्रतिनिधी- ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या ठेवी सहा महिन्याचा विलंब न लावता तात्काळ द्याव्यात अशी मागणी टायगर ग्रुप बीड जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली असून कारवाईसाठी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह लिमिटेड बँक यामध्ये बीड जिल्हयातील हजारो ठेवीदारांच्या कोटयावधी रुपये अडकले आहेत. बँक प्रशासकीय व्यवस्थापनाने पुढील सहा महिन्यात ठेवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे, तो सरासर चुकीचा असून अनेक ठेवीदारांच्या ठेवी मुदत पूर्ण झाल्या आहेत. यामुळे बँकेने नेमका कोणता कारभार केला, ज्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास त्यांना वेळ लागत आहे. या करीता टायगर ग्रुप बीड जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाईसाठी आणि सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले. आपण तात्काळ ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह बँक यांचेकडून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कारवाई करावी नसता टायगर महाराष्ट्र राज्य ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालया समोर हजारो ठेवीदारांना सोबत घेत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करेल. याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा ज्ञानराधा मल्टीस्टेट चे विरोधात टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने टायगर ग्रुप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सदस्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?