ग्रामरोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू
ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सेवकांची उपस्थिती होती.
बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ग्राम रोजगार सेवक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. ग्रामरोजगार सेवकांना मागील 2016 पासून निर्वाह भत्ता मिळालेला नाही त्याची मागणी वारंवार केलेले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आपल्या कार्यालयास प्राप्त आहे गेल्या एक वर्षापासून मस्टर मानधन मिळालेले नाही यासाठी ग्राम रोजगार सेवक संघटना आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात रोजगार सेवकांना टेबल खुर्ची कपाट व स्टेशनरी साहित्य मिळालेले नाही यासाठी बीड जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेले आहे.
What's Your Reaction?