लोणी पिंपळा येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांचे भव्य स्वागत

आष्टी प्रतिनिधी: आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचे लोणी पिंपळा परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले, गावात वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली तसेच जेसीबी मधून पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जनार्दन भवर, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजयकुमार नामदेव भवर तसेच त्यांचे समर्थक आणि माजी सरपंच इसाक तांबोळी, माजी उपसरपंच सुभाष भवर , लोणीचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सागर भवर त्याचप्रमाणे खरड गव्हाण येथील रणजीत वाडेकर, अक्षय काळोखे, संदीप कारंडे, लालू शेख यांनीही माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला. लोणी येथे झालेल्या जाहीर सभेस माजी सभापती साहेबराव म्हस्के, लक्ष्मण कराळे, सरपंच सावता ससाणे, हरिभाऊ जंजिरे, ॲड रत्नदिप निकाळजे, उपसरपंच चांगदेव एकशिंगे,थोरात सर, माजी उपसभापती जनार्दन भवर,
राम शिंदे, रामेश्वर वाळके, चेअरमन बाळासाहेब भवर, पांडुरंग गावडे, चंद्रशेखर साके, दादासाहेब विधाते, , संजय धायगुडे, गणेश पोकळे, पांडूळे पाटील, बाळासाहेब बेल्हेकर, दादासाहेब सांगळे, उपसरपंच राम देवकर, छबुराव देवकर, युवराज कटके, माजी सरपंच राजु गावडे, दादासाहेब सांगळे, विजयकुमार भवर, नवनाथ रक्टाटे, संतोष वाळके, दत्ता विधाते यांच्यासह लोणी पिंपळा परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ..
What's Your Reaction?






