ऐकायला कमी येतंय ? आता चिंताच कशाला करताय !

पूर्वी ऐकण्याच्या समस्येवर उपचारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हते. मात्र अहमदनगरातच अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरांकडे जाणारे रुग्ण अहमदनगर मधेच स्थिरावले आहेत.
कर्णबधिरता, बहिरेपणा यांवर उपाय म्हणजे व्हिआर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक हे समीकरण अहमदनगर, छ. संभाजीनगर, बीड, चाळीसगावव, पुणे येथे तयार झाले आहे.
प्रख्यात ऑडिओलॉजिस्ट राठोड यांनी अहमदनगर आणि परिसरातील जिल्ह्यातील कर्णबधिर व्यक्तींवर केलेल्या यशस्वी उपचारांमुळे रुग्णांत निर्माण झालेला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर आलेले हसू हेच व्हिआर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकचे यश आहे असे, ऑडिओलॉजिस्ट राठोड नेहमी सांगतात.
श्रवणयंत्रे, क्लॉक्लियर इंप्लांट, बाह्य इंप्लांट याबरोबरच श्रवण क्षमता व चक्कर संबंधित तपासण्या असलेल्या ऑडीओमेट्री, इंपेडन्स, ओ.ए.ई., बेरा (एसी, बीसी, टीबी, एचआर), सि.ए.पी.डी., स्पीच व एडेड ऑडिओमेट्री, टीन्नीटस अशा चाचण्या व्हिआर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक येथे केल्या जातात. याशिवाय उशिरा/तोतरे/अडखळत बोलणे, आवाजाचे दोष, लर्निंग डिसॅबिलिटी, ऑटिझम, चंचलपणा, गतिमंदपणा, लकवा, बहिरेपणा यांवर आवश्यक असलेली स्पीच थेरपी ISO CERTIFIED 9001 : 2015 प्रमाणित असलेल्या व्हिआर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक मध्ये दिली जाते.
आपले मूल नीट ऐकू शकत नाही हे अनेकदा पालकांना लवकर लक्षात येत नाही. काही महिन्यांनी ही बाब जाणवली की त्या पालकांवर जणू आभाळ कोसळते. ऐकू येत नसल्यामुळे साहजिकच अनेक बालकांना नीट बोलताही येत नाही. याचा थेट परिणाम त्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर आणि आपसूकच त्यांच्या जीवनावर होतो. मात्र वेळीच तपासणी आणि उपचार करून घेतले तर पुढील काळात होणारा त्रास वाचतो हे हजारो रुग्णांचे अनुभवच बोलतात.
ही समस्या जशी लहान मुलांमध्ये आहे, तशी ती सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये कधीही लक्षात येऊ शकते. ऐकू कमी येणे, बहिरेपणा जाणवणे यांमुळे समाजात वावरताना संबंधित व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. वेगळेपणाची भावना अशा लोकांमध्ये येऊ लागते. चारचौघांत बोलताना आपण कमी आहोत असे त्यांना वाटू लागते.
पूर्वी अशी समस्या असेल तर श्रवणयंत्र बसविणे हे कमपणाचे वाटत असे. मात्र आता कमी ऐकू येत आहे हे लक्षात येताच त्वरित श्रवणयंत्र बसविण्याकडे कल वाढत आहे, असे ऑडिओलॉजिस्ट राठोड सांगतात.
What's Your Reaction?






