मा. सभापती खुर्शीद आलम यांच्या पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत

मा. सभापती खुर्शीद आलम यांच्या पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत

सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पाणीपुरवठ्याचे काम सुरू होऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला.

बीड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे बीड शहराला अम्रतजलची योजना मंजूर झाली, गुत्तेदाराला दोन वर्षात जलवाहिनीचे काम पुर्ण करण्याचे वर्क ऑर्डर मिळाले होते, पण पुर्ण न करताच ११४ कोटी मधून ९३ कोटी खाऊन बसले होते, दोन वर्षांत करण्याचे काम सहा वर्षे पासून रखडले म्हणून बीड नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दखल घेऊन मुख्याधिकारी अंधारे यांचे इंजिनिअर आणि महाराष्ट्र प्राधिकरणाचे सर्व वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकार्यां सहित तक्रारदार माजी सभापती खुर्शीद आलम आणि सहकार्यांच्या उपस्थितीत प्रत्येक सोमवारी असे पाच मिटिंगे घेऊन कामाचा आडाखडा तैयार करुन कामाला सुरूवात केली, सुरूवातीला गांधीनगर परिसरात पाणी सोडण्यात आले आहेत, येथील नागरिकांना हक्काचे आणि भरपूर पाणी मिळाल्यामुळे पाणीसाठी प्रयत्न करणार्या अधिकार्यां आणि पदाधिकाऱ्यांचे विशेषत जिल्हाधिकारी,आ.संदिप क्षीरसागर,मा.आ.सलीम साहेब, आणि प्रत्येक मिटींगमधे खुर्शिद आलम यांचे सोबत असलेले सहकारी गुंजाळ मेंबर,बाबु मुळुक, बनसोडे मेंबर,अमोल पऊळ मेंबर, शेख अझहर, रेहाना पठाण मॅडम,उडान मेंबर, रर्ईस भाई,कालु बेग,लक्षमन साहेब,शहेबाज सौदागर, व इतरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत, गांधीनगर पासून सुरूवात झाली असले तरी आत्ता उर्वरित पुर्ण बीड शहरातील प्रत्येक घराला हक्काचे पाणी मिळणार आहेत असे मत मा. सभापती खुर्शीद आलम यांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow