मंत्री संजय राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने सन्मान

बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव महाराज यांची मुर्ती अनावरण व कलशारोहन गेवराई तालुक्यातील काठोडा येथील तिर्थक्षेत्र संत रामराव महाराज गड येथील आले असता जिल्ह्यामध्ये मंत्री झाल्यानंतर पहिल्यादांच आल्याने बीड जिल्हा बंजारा परिषदेच्यावतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.संजय राठोड व पोहरादेवी भक्तीधामचे मठाधिपती महंत जितेंद्र महाराज यांचा भव्यदिव्य जंगी स्वागत करत सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वयक किसनभाऊ राठोड आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याचे दंबग जिल्हाध्यक्ष बाजीराव महाराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांचा काठोडा फाटा येथे तर पोहरादेवी भक्तीधामचे महंत जितेंद्र महाराज यांचा जातेगाव फाटा येथे भव्यदिव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी जीवन राठोड, पत्रकार नितीन चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाजीराव महाराज, बीड शहर अध्यक्ष सचिन जाधव, अशोक पवार, अनिल पवार, पवन जाधव, रामराव महाराज, सरपंच कृष्णा चव्हाण, बाळराजे राठोड, कृष्णा महाराज, रमेश राठोड, शामराव पवार यांच्यासह आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






