डॉ.ज्योती मेटे उमेदवार असतील तर लोकसेना संघटना समर्थन देणार: इनामदार

डॉ.ज्योती मेटे उमेदवार असतील तर लोकसेना संघटना समर्थन देणार: इनामदार

बीड प्रतिनिधि: लोकसेनाने महाविकास आघाडीकड़े लोकसभेच्या अट्ठेचाळीस जागेपैकी दहा जागा मुस्लिम समाजाला समतेच्या आधारावर राजकीय वाटा म्हणून द्यावे अशी मागणी केली होती या मागणीकड़े मविआने डोळेझाक केल्यामुळे लोकसेना संघटनेला मैदानात उत्तरावे लागले पुण्याची जागा निश्चित झाली असून इतर ठिकाणच्या जागा पण लवकर घोषित करणार आहे कारण आम्ही स्वाभिमानाने लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढा देत आहाेत. जो पर्यंत मुस्लिम समाजाच्या शिक्षण आरक्षण आणि संरक्षणा सारख्या गंभीर विषयाकड़े दुर्लक्ष होईल तो पर्यंत लोकसेना सगळ्या पक्ष नेत्यांना सळाे की पळाे करुन सोडणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे. बीड लोकसभा मतदार संघातुन भाजपाच्य वतीने पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी घोषित झाली असून राष्ट्रवादीला उमेदवारच सापडेना जर ज्योतीताई मेटे बीड लोकसभेच्या मैदानात उतरत असतील तर लोकसेना बीडला उमेदवारी देणार नाही कारण लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे हे मराठासह बहुजन अल्पसंख्याक समाजासाठी लढा देणारे नेते होते त्यांच्या अपघाती मृत्युने बीड जिल्ह्याचे खुप नुकसान झालेले आहे आणि सहानुभूति म्हणून बीड जिल्हा ज्योतीताई मेटे यांना सहकार्य करील. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि विनायकराव मेटे साहेब बीड जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी लोक आंदोलनाची धगधगती मशाल होती आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांचा तो दरारा पाहिलेला आहे त्यांच्यावर किंवा त्यांच्या एखाद्या कार्यकर्तेवर दिल्लीवाल्याकडून अन्याय झाला तर महाराष्ट्रात मुंडे साहेब वाघासारखी डरकाळी फोडायचे की लगेच चाळीस पन्नास आमदार दहा बारा खासदार व शेकड़ो पदाधिकारी हे राजीनामे दयायचे आणि दिल्लीतील अटलबिहारी वाजपाई लालकृष्ण आडवाणी सारखे नेते हालायचे व मुंडे साहेबांना दिल्लीत बोलावून मागण्या मान्य करायचे परंतु पाच वर्षापासून पंकजाताई मुंडे यांचे देवेंद्र फडणवीस व भाजपाने खच्चीकरण केले राजकारणापासून दूर ठेवले तरी पंकजाताई मुंडे यांची अशी कोणती मज़बूरी होती का लाचारी होती त्यांनी फडणवीस व भाजपाला धड़ा शिकवला नाही आणि मुंडे साहेबांसारखी ती धमकच ताईमध्ये दिसली नाही उलट आपल्याच बहिण डॉ. प्रीतमताई मुंडे हे दहा वर्षापासून बीडच्या खासदार आहे रंनिंग खासदाराचे टिकिट कापले असता तुम्ही भाजपाचे धन्य मानले का तर स्वताला टिकिट जाहिर झाले म्हणून आपण पंकजाताई स्वताला न्याय मिळवून देवू शकत नाही बीड जिल्ह्याला व जनतेला काय न्याय मिळवून देणार? दुसरीकडे बजरंग बप्पा सोनवणे काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या गटातुन शरद पवार गटात आल्याने लोकांच्या मनात जरा शंकाच निर्माण होत आहे म्हणून ज्योतीताई मेटे बीडला उमेदवार असतील तर लोकसेना संघटना उमेदवार देणार नाही व खंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहु नसता लोकसेना संघटना बीड लोकसभेला उमेदवार देणार आहे अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे.   

                        

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow