जर तुम्ही अचानक फ्रीजचं पाणी प्यायलात तर

जर तुम्ही अचानक फ्रीजचं पाणी प्यायलात तर
जर तुम्ही अचानक फ्रीजचं पाणी प्यायलात तर त्यानं सर्दी होते. तर काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. तर याच वेळात अनेकांच्या थायरॉईड आणि टॉन्सिल्सच्या गाठींची वाढ होऊ शकते. थंड पाणी प्यायल्यानं हृदयाचे ठोके मंदावण्याची शक्यता असते. थंड पाण्याचा थेट परिणाम व्हॅगस नर्व्हवर होतो, त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात.
आयुर्वेदानुसार, थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते. जेवण केल्यानंतर पचन प्रक्रिया जेव्हा सुरु असते तेव्हा पाणी प्यायला नको, नाही तर अपचनची समस्या उद्भवू शकते. सतत फ्रीजचं थंड पाणी प्यायल्यानं वजन वाढण्याची शक्यता वाढते. वजन कमी करायचे असल्यासं थंड पाणी पिणे बंद करा. फ्रीजमधील पाणी प्यायल्यानं तुम्हाला आतड्यांच्या समस्या होऊ शकतात. कधी पोट दुखू शकते तर तर पोच साफ न होण्याची देखील समस्या उद्भवते. उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचा सल्ला अनेक लोक देतात. ते नसेल तर रूम टेम्परेचरवर असलेलेले पाणी तुम्ही पिऊ शकतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow