अंजनवती शिवारात शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगार्याला अज्ञाताने लावली भीषण आग

बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील अंजनवती शिवारातील शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाला अज्ञात माथे फिरूने भीषण आग लावल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही जमिनीच्या वादातून झाली असल्याचा संशय शेतकरी जालिंदर जाधव यांनी व्यक्त केला
बीड तालुक्यातील अंजनवती येथील शेतकरी जालिंदर आश्रुबा जाधव यांनी गोळा केलेली ४ एक्कर सोयाबीन मध्यरात्री जमिनीच्या वादातून भावकीतील मंडळींनी जाळुन टाकल्याचा संशय पिडीत शेतकरी जालिंदर जाधव यांनी केला आहे. संबधित प्रकरणी सपोनि नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय विलास हजारे यांना डॉ.गणेश ढवळे यांनी कल्पना दिली आहे. बीड तालुक्यातील अंजनवती येथील शेतकरी जालिंदर आश्रुबा जाधव यांनी त्यांच्या शेतामध्ये साडे आठ एकर सोयाबीनचे पिक घेतले होते.काल मजुर लाऊन ४ एकर मधील सोयाबीन शेतात गोळा करुन ठेवली होती.पहाटे ६ वाजता शेतातील गोठ्यात झोपलेले जालिंदर जाधव यांचा मुलगा सुधीर जाधव यांना सोयाबीन काढलेल्या शेतात जाळ दिसुन आला.त्याठिकाणी त्यांनी धाव घेतली असता संपूर्ण सोयाबीन जळुन खाक झाले होते.यामध्ये एकुण अडीच लाखांच्या आसपास शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
What's Your Reaction?






