बीड शहरात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

बीड शहरामध्ये बेकायदेशीर रित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्टल जप्त करत तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.
बीड शहरात स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमी मार्फत बीड शहरामध्ये अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांच्या संदर्भात माहिती मिळाली त्यानंतर इसम नामे सागर प्रकाश मोरे व वैभव संजय वराट हे सरस्वती विदयालय समोर, जुना धानोरा रोड, बीड येथे विनापरवाना बेकायदेशिर रित्या स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगत उभे आहेत. त्यावरुन सदर ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी वरील दोन इसम मिळुन आले त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव त्यांचे सागर प्रकाश मोरे वय 22 वर्ष रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड वैभव संजय वराट वय 21 वर्ष रा. स्वराज्य नगर, बीड असे सांगितले त्यांचे अंगझडती मध्ये दोघाकडे प्रत्येकी एक-एक अग्नीशस्त्र गावठी पिस्टल व 05 जिवंत काडतुस मिळुन आले. त्यानंतर आरोपींतांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरच्या गावठी पिस्टल आम्ही सुयोग ऊर्फ छोटया मच्छिद्र प्रधान रा. स्वराज्य नगर, बीड ह.मु. जिजामाता चौक, बीड यांच्याकडुन घेतले आहेत व त्याने व आम्ही एक गावठी पिस्टल शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यास विक्री केलेले आहे व तो सध्या पोलीस पेट्रोलपंप समोर बालेपीर येथे उभा आहे. असे सांगितल्याने लगेच सदर ठिकाणी जाऊन शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख वय 21 वर्ष रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यास ताब्यात घेवून त्याचे अंगझडती मध्ये एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल ) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. यातील सागर प्रकाश मोरे वय 22 वर्ष रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड वैभव संजय वराट वय 21 वर्ष रा. स्वराज्य नगर, बीड शहानवाज ऊर्फ शहानु पिता अजीज शेख वय 21 वर्ष रा. आजमेर नगर, बालेपीर, बीड यांचेविरुद्ध फिर्यादी नामे श्रीराम खटावकर पोलीस उप-निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?






