बीड जिल्ह्यामध्ये लाचखोर काही थांबेना अजून दोन जण एसीबीच्या जाळ्यात!

Stay informed and engaged with Beed News, your reliable source for comprehensive coverage of local and global news, featuring insightful articles, expert analysis, and exclusive interviews across various topics

बीड जिल्ह्यामध्ये लाचखोर काही थांबेना अजून दोन जण एसीबीच्या जाळ्यात!

बुधवारी दि.31 सकाळीच पाटोदा येथे एका शेतकर्‍याकडून कांदा चाळीच्या अनुदानासाठी दीड हजाराची लाच घेताना कृषी सहायक रंगेहाथ पकडला. या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोच वडवणी येथे ग्रामसेवकावर एसीबीने कारवाई केली.

वसंत बळवंतराव जांभळे असे लाचखोर ग्रामसेवकाचे यांचे नाव आहे. त्यांच्याकडे वडवणी तालुक्यातील ढोरवाडी ग्रामपंचायतचा पदभार होता. त्यांनी तक्रारदारला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत विहीर मंजूर करुन देण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन सदरची फाईल तयार करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करुन पंचासमक्ष दहा हजार रुपये स्विकारले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील निरीक्षक अशोक हुलगे, सिद्धेश्वर तावसकर, दत्तात्रय करडे, बीडचे अंमलदार संतोष राठोड, अविनाश गवळी यांनी केली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जांभळे यांच्याकडे वडवणी खापुरवाडी, हिवरगव्हण, ढोरवाडी येथील गावांचा पदभार होता. दिवसभरात दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात लाचखोरी किती वाढली आहे हे दिसून येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow