एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34 टक्यावरून 38 टक्के वाढ

मुंबई प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मान्यता दिली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
What's Your Reaction?






