सूतगिरणीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! बिरसा फायटर्स ची मागणी
शहादा प्रतिनिधी :- लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदुरबार येथील एमडी श्री. राजाराम दुल्लभ पाटील,उपकार्यकारी संचालक श्री.उत्तम संभू पाटील व सहका-यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची,आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करा,त्यांना पदावरून हटवा व कामगारांच्या बेमुदत संपाच्या मागण्या पूर्ण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे,कामगार प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख,नंदूरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री व उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी ईमेल द्वारे संबंधित विभागाला पाठवले आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदूरबार येथील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२/०८/२०२३ पासून सुतगिरणी गेटसमोर बेमुदत संप सुरू केला आहे.दरम्यान सुतगिरणीचे एमडी श्री. राजाराम दुल्लभ पाटील यांनी दिनांक २४/०८/२०२३ रोजी संपाचे बॅनर फाडत एका कामगारास मारहाण केली आहे. सन २०१७ पासून आजपर्यंत थकित असलेला ५-६ वर्षांचा पिएफ मिळावा.मागील वर्षांचा व या वर्षीचा बोनस मिळावा.गेल्या १२वर्षापासून ग्रज्यूईटी मिळत नाही,ती मिळावी.रिटायर्ड कामगारांना ग्रॅज्यूइटी परत घेऊ नये.कामगारांना पेन्शन मिळावी. पीएफचा फार्म सुतगिरणीत भरावा,फार्म भरण्यासाठी एजेंटकडे पाठवू नये.कारण फार्म भरण्यासाठी एजेंट ४००० रूपये उकळतात.कायम कामगार आजारपणामुळे उपचारासाठी ६ महिने घरी राहिल्यावर त्यांचा रोजचा पगार ५५० वरून ३५० रूपये करू नये.इंडेक्स वाढल्यानंतर कामगारांचा पगार वाढवावा. पतपेढीत किंवा बँकेत कर्ज घेतल्यावर सुतगिरणीत कामगाराच्या पगारातून कपात झालेला हप्ता पतपेढीत किंवा बँकेत भरला जात नाही,तो भरावा.सुतगिरणीतील झाडे/ वृक्षतोड करू नये.सुतगिरणीतील उपयोगी वस्तू विकू नयेत. शेतक-यांचे कापसाचे/ मालाचे थकित पैसे द्यावेत. कामगारांचे थकित पैसे द्यावेत.
ह्या मागण्या भ्रष्टाचाराची ,आर्थिक गैरव्यवहाराची संबंधित असून सूतगिरणीचे विद्यमान एमडी राजाराम दुल्लभ पाटील,उपकार्यकारी संचालक उत्तम संभू पाटील व त्यांचे सहकारी याला सर्वस्वी जबाबदार असून त्यांना तात्काळ पदावरून हटवा,त्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करा व कामगारांच्या बेमुदत संपाच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे.
What's Your Reaction?