पोलीस ठाण्याच्या झाडावर थुंकल्याचे ल्याचे अंगलट आले ;गुन्हा दाखल
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कायद्याने बंदी घातलेली आहे. परंतु सवयीप्रमाणे रस्त्याने चालताना लोक पाहिजे तेथे थुंकतात. परंतु त्यामुळे इतरांवर त्याचे गंभीर परिणाम होतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.आपल्या थुंकल्यामुळे इतरांनी एखाद्या रोगाचा संसर्ग होईल याचा थोडाही विचार करत नाहीत. त्याचाच फटका एका सामान्य नागरीकाला केजमध्ये बसला आहे. पोलिस ठाणे आवारातील झाडावर थुंकल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई पोलिस करत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा या सारखे पदार्थ खाऊन थुंकण्यास बंदी असतानाही सरकारी कार्यालयाच्या भिंती आणि खिडक्या रंगलेल्या दिसतात. अशा थुंकण्यावर कोणी कारवाई करीत नाहीत. पोलीस हवालदार सुधाकर जालिंदर दौंड हे कर्तव्यावर असताना पोलीस ठाणे परिसराची पहाणी करीत असताना पोलीस ठाण्याच्या मुख्य गेट समोरील अशोक वृक्षाच्या झाडाच्या बुडा जवळ व बुडावर तसेच नालीवर कोणी तरी अज्ञान इसम थुंकलेले दिसले. झाडावर कोण थुंकले या बाबत कोणी पाहिलेले नाही. परंतु अशा सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयात येणार्या अनोळखी व्यक्तीने पोलीस स्टेशन केज येथील आमलदार व अधिकारी व इतर लोकांच्या आरोग्यास आपायकारक होइल; असे पोलीस स्टेशनच्या गेट समोरील अशोकाच्या वृक्षावर पान तंबाखु व गुटखा खावुन झाडावर व जमिनीवर थुंकून पोलीस स्टेशन केजच्या आवारातील वातावरण दूषित केले.
याची माहिती पोलीस हवालदार दौंड यांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलीस हवालदार दौंड यांच्या फिर्यादी वरून अनोळखी व अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. 322/2023 भा. दं. वि. 278 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.
What's Your Reaction?