बीडच्या काकड हिरा येथील जवान सिक्कीम महापुरात बेपत्ता

बीडच्या काकड हिरा येथील जवान सिक्कीम महापुरात बेपत्ता

बीड ( प्रतिनिधी) : उत्तर सिक्कीम मधील ल्होनाक सरोवराजवळ झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या खोऱ्यात आलेल्या आकस्मिक पुरात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 22 लष्करी जवानासह 102 जन अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावचा पांडुरंग वामन तावरे वय 36 वर्ष हा जवान तिस्ता नदीच्या पुरात वाहून गेल्याचे समजले असून संबंधित विभागाकडे दिनांक पाच सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी चौकशी केली असता अद्याप पर्यंत शोध लागला नसल्याचे संबंधित लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे .

अशी माहिती पांडुरंग तावरे जवानांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे यांना दूरध्वनी द्वारा दिली आहे. पांडुरंग वामन तावरे हे 2009 आर्मीमध्ये भरती झाले होते. मागील 14 वर्षापासून ते 18 महार बटालियन मध्ये नायक पदावर कार्यरत होते. त्यांनी दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश व पंजाब मध्ये विविध ठिकाणी सेवा केलेली आहे. दोन महिन्या पूर्वी ते सिक्कीम येथे कार्यरत होते. नुकत्या सिक्कीम येथे आलेल्या पुरात पांडुरंग तावरे वाहून गेल्याचे समजले असून अद्याप पर्यंत पांडुरंग तावरे यांचा शोध लागलेल्या नाही .आज दिनांक सहा ऑक्टोबर 2023 रोजी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना भेटणार असल्याची माहिती पांडुरंग तावडे यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी यावेळी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow