पत्रकार सुनील जाधव, काळकुटे ,पठाण राज्यस्तरीय समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

एम एस कंट्रक्शन आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील मित्र मंडळाच्या वतीने, स्व.शंकरराव ढोले व स्व .राणुजी ढोले यांच्या पुणस्मरणार्थ पत्रकारिते सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने, पत्रकार सुनील जाधव ,पत्रकार अशोक काळकुटे, पत्रकार अमजद पठाण यांच्यासह अनेकांना जिव्हाळा निवारा केंद्रात राज्यस्तरीय समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करत, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे बार्शी नाका बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा)ढोले पाटील यांचे आजोबा स्व. शंकरराव ढोले व वडील स्व. राणुजी ढोले पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले राबवले होते.त्यांनी केलेल्या कामाला उजळा देण्यासाठी हे उपक्रम राबवले होते. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि 25 जुन रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.व जिव्हाळा निवारा बेघर केंद्रात सकाळी आनाथ निरधार लोकांना अन्नदान करण्यात आले. आणि त्यांना जिवन आवश्यक वस्तु वाटप केल्या. तसेच पत्रकारीता क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय समाजसेवारत्न पुरस्काराने पत्रकार सुनिल जाधव, अशोक काळकुटे, अमजत पठाण, शरद झोडगे, विलास सांवत, राजु वंजारे, सह आदींचा राज्यस्तरीय समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मान करत पुढील कार्यासाठी त्यांना सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील यांच्यासह एम एस कंट्रक्शन व सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेवक सातिराम ढोले, प्रविण पालीमकर, नितिन आगवान, मनसेचे सदाशिव बीडवे, दिपक ढोले, सुनिल महाकुंडे, सुधिर भांडवले यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Files
What's Your Reaction?






