बीड मध्ये अपहरण करून 20 लाखाची खंडणी मागितली
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बीडमध्ये एका विद्यार्थ्यांच अपहरण करून त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये अटक केली आहे. मनीष क्षीरसागर आणि संतोष गिरी अस या दोन आरोपीचे नाव असून त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून एका विद्यार्थ्यांचं अपहरण केलं. त्याला आज्ञास्थळावर नेऊन बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. यावेळी या विद्यार्थ्याच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण देखील करण्यात आली. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर विद्यार्थ्यांने थेट पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात दोन आरोपींना अटक केली असून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
The pricesize of these hearing aids Call 9657588677
What's Your Reaction?