गोरे वस्ती येथे चिखलाचे साम्राज्य
बीड प्रतिनिधी:- गोरे वस्ती इदगाह रोड या भागातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे या भागात पाऊस आल्यानंतर लहान मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना कसरत करावी लागत आहे शाळेला जाण्यासाठी लहान विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे.
गोरेवस्ती, इदगाह रोड, हा परिसर वासनवाडी या ग्रामीण भागात येत असल्याने या भागातील सरपंचांनी व ग्रामसेवकांनी त्वरित लक्ष घालून या भागामध्ये मुरूम तरी टाकून देण्यात यावे जेणेकरून या भागातील नागरिकांना त्रास होणार नाही.
जर या भागाला जाणून बुजून दुर्लक्ष करणार असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेळण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे निराधार निराश्रीत विभागाचे बीड तालुकाध्यक्ष शेख जाहीर शेख अमीर यांनी केला आहे
What's Your Reaction?