बीडमध्ये माजी मंत्र्यांच्या पीएवर चाकू हल्ला
बीड प्रतिनिधी- माजी मंत्री सुरेश नवले यांचे स्वीय सहायक ललित अब्बड यांच्यावर दुचाकीवरून येत दोघांनी कोयत्याने वार केले. सुदैवाने हे वार चुकवल्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर जखमा झाल्या आहेत.हा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बीड शहरातील महावीर चौकात घडला.
सध्या अब्बड यांच्यावर जिल्हा रूग्णालात उपचार सुरू असून लोकांनी गर्दी केली होती. ललित अब्बड यांचे पेठबीड भागातील महावीर चौकात घर आहे. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते घरासमोर उभा होते. यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. अब्बड यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतू अब्बड यांनी अचानक पाहिल्याने हा वार चुकवत हातावर घेतला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मोठी जखम झाली आहे. तसेच डाव्या हाताच्या मनगटावरही जखम झाली असून टाके घेण्यात आले आहेत. हल्ला केल्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्यानंतर अब्बड यांना आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेत त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हे ओळखीचे असल्याची चर्चा रूग्णालय परिसरात होती. परंतू या प्रकरणात पोलिस दफ्तरी काहीच दाखल झाले नव्हते.
What's Your Reaction?